Mon. Oct 25th, 2021

‘देशात आता ‘मोदी’ लिपी चालतेय’, राज ठाकरेंचा पुन्हा पंतप्रधानांवर निशाणा

‘आधी देशात मोडी लिपी चालत होती आता मोदी लिपी चालते’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर आपल्या खास शैलीत निशणा साधला आहे. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी राज ठाकरे मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत आले होते.

काय म्हणाले राज ठाकरे?

बदलत्या काळानुसार संगणक आणि apps मुळे कलाकार त्यात अडकून पडले आहेत.

त्यामुळे हाताला वळण देणं हा प्रकार कमी झाला आहे.

मात्र अच्युत पालव यांनी मोडी लिपी जगभरात पोहोचवली.

त्यासाठी अच्युत पालव यांनी अपार कष्ट घेतले आहेत.

तितकीच श्रद्धा आणि सबुरी दाखवली आहे, त्यामुळे आपण आज हा दिवस उजाडला असं राज ठाकरे यांनी म्हटलं

आजोबांची आठवण

दरम्यान त्यांनी आपल्या आजोबांची आठवण ही सांगितली.राज म्हणाले,’माझ्यावर बाळासाहेब आणि माझ्या वडिलांचा प्रभाव पडला आहे. आजोबा त्यांची सही मोडी लिपीमध्ये करायचे.

पूर्वी अनेक दस्ताऐवज हे मोडी लिपी मध्ये लिहिलेले असायचे.

आता मोडी पाहायला मिळत नाही.

देशात फक्त मोदी लिपी पहायला मिळते.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर लोकांचा एकच हशा पहायला मिळाला. 23 जानेवारीला गोरेगाव येथे मनसेच महाधिवेशन होणार आहे. त्यात ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *