Tue. Jun 18th, 2019

राज ठाकरेंकडून डिजिटल गाव हरिसालबद्दलचा मोठा खुलासा

570Shares

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते प्रचार सभा घेत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात जाहीर सभा घेतली. सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघात राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. मोदींनी जाहीर केलेले डिजिटल गाव हरिसालबद्दल राज ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे डिजिटल गावाच्या जाहीरातीमध्ये दाखवलेला मॉडेल सुद्धा राज ठाकरे यांनी मंचावर आणला होता.

काय आहे खरं सत्य ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात जाहीर सभा घेतली.

या सभेमध्ये राज ठाकरे यांनी डिजिटल गाव हरिसालबद्दल खुलासा केला.

डिजिटल गावाच्या जाहीरातीमध्ये दाखवलेला मॉडेल राज ठाकरे यांनी मंचावर आणला होता.

या मॉडेलला भाजपावाले शोधत असून झालं- गेल विसरून जा आणि परत ये असंही सांगत आहे.

जेव्हा मी हरिसालची पोलखोल केली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी म्हणाले राज ठाकरे गेलेच नाही.

मात्र तुम्हाला हा मॉडेल मी दाखवला आणि परिस्थिती सुद्धा.

आता यावर मुख्यमंत्री काय उत्तर देतील असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

 

 

570Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *