Fri. Jan 28th, 2022

T1 वाघिणीच्या मृत्यूत मनसेची उडी

T1 वाघिणीच्या हत्येप्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी मारली आहे. या प्रकरणी त्यांनी भाजप सरकार आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

‘वाघिणीला मारायची गरज नव्हती, तिला बेशुद्ध करायला हवं होतं, पुतळे उभारुन वाघ वाचत नाहीत’ अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसंच ‘सुधीर मुनगंटीवार बेफिकीरपणे उत्तरं देतात, ते वनमंत्री आहेत म्हणजे त्यांना त्यातलं सगळचं कळतं असं नाही. उद्या त्यांचं वनमंत्रीपद जाऊ शकतं’ असंही राज ठाकरे म्हणाले.

‘सरकारला सत्तेचा माज आला आहे, आम्ही काहीही केलं तरी सगळं सहन केलं जातंअशी त्यांची मानसिकता बनली पण घोडा मैदान जवळ आहे, लवकरच कळेल’ अशा शब्दात राज ठाकरेंनी निशाणा साधला.

‘ज्या ठिकाणी वाघिणीला मारलं तिथे अनिल अंबानींना सरकार जागा देणार असल्याची चर्चा आहे, अनिल अंबानीसाठी देश विकायला काढाल असून एवढं सरकारचं भान सुटलं’ असंही राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *