राज ठाकरेंनी मानले योगी सरकारचे आभार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिकेनंतर उत्तरप्रदेशात भोंग्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील ११ हजार भोंगे उतरवण्यात आले आहेत. तसेच ३५ हजार मंदिर-मशिदींनी आवाजावर बंधने घातली आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी योगी सरकारचे आभार मानले आहेत.
उत्तर प्रदेशात भोंग्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंनी योगी सरकारचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशात भोंगे उतरवल्याने राज ठाकरेंनी योगींचे कौतुक केले आहे. तसेच ‘महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, फक्त सत्तेचे भोगी’, अशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
योगी सरकारचे आभार, राज्य सरकारवर टीका
उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी योगी सरकारचे आभार मानले आहेत. ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.’ तर महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’. महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.’
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
‘उत्तरप्रदेशात ११ हजार भोंग्यांचा आवाज बंद’
उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत. तसेच ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.