Tue. Oct 26th, 2021

…म्हणून राज ठाकरेंकडून चक्क अमित शाह यांचं अभिनंदन

पुणे : ‘मी या कायद्याबद्दल अमित शाहांचे अभिनंदन करतो. त्यांनी फार हुशारीने देशाचे आर्थिक मंदीवरील लक्ष हटवलं. मंदीवरील लक्ष हटवत लोकांना सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी सारख्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवले’, यासाठी राज ठाकरे यांनी अमित शाह यांचे उपरोधिकपणे अभिनंदन केलं.

मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

देश धर्मशाळा आहे का ?

आपल्या 135 कोटींच्या देशामध्ये आणखी लोकांची गरज काय, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आपल्या देशात इतर देशांमधील लोकांना सामावण्यासाठी भारत काही धर्मशाळा नाही आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

भारतात अनेक वर्षांपासून वासतव्यास असलेल्या मुस्लिमांना असुरक्षित वाटण्याची काहीच गरज नाही, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

आधारवरुन निशाणा

मतदानासाठी आधार कार्ड वापरु शकत, मग नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड का चालू शकणार नाही ? असा सवाल पत्रकार परिषदेत केला. जर आधार कार्डचा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी उपयोग होऊ शकत नाही, मग लोकांना आधारसाठी तासनतास रांगेत उभं राहायला भाग पाडलंत. त्याचा काय उपयोग , असा सवाल देखील राज ठाकरेंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *