Mon. Jul 22nd, 2019

‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला; राज ठाकरेंची जॉर्ज यांना हटके आदरांजली

145Shares

कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असं राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून म्हटलं आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांचं आज म्हणजेच मंगळवारी सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.

फर्नांडिस यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी देखील मंगळवारी दुपारी ट्विटरवर व्यंगचित्र शेअर करत जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून म्हटलं आहे.

अनेक कामगार संघटांनाचे नेतृत्व करताना फर्नांडिस यांनी कामागारांच्या मागण्यांसाठी बंदचे शस्त्र वापरले. त्यांची ओळख जॉर्ज फर्नांडिस ‘बंदसम्राट’ अशी तयार झाली.

त्यांच्या नेतृत्वाखाली 1970 च्या दशकामध्ये अनेकदा मुंबईमधील संघटित कामगारांनी बंदची हाक दिली आणि ती यशस्वी करुन दाखवली.

फर्नांडिस म्हणजे बंद हे जणू समीकरणच झाले होते. जवळजवळ दोन दशके फर्नांडिस यांनी बंदच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सामान्य मुंबईकरांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवले.

145Shares

Leave a Reply

%d bloggers like this: