Sun. Jun 20th, 2021

मराठी भाषा दिनी राज ठाकरेंनी केला काश्मिरी तरूणीचा व्हिडिओ शेअर

आज संपूर्ण राज्यात मराठी भाषा दिन मोठ्या आनंदात सादरा होत आहे. यासाठी अनेक स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या दिनानिमित्ताने अनेक नेतेमंडळी शुभेच्छा देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरून दिल्या आहेत. मात्र राज ठाकरेंनी तमाम मराठी लोकांसाठी या शुभेच्छा जरा हटके अंदाजात दिल्या आहेत.

त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

नक्की काय आहे व्हिडिओमध्ये ?

हा व्हिडिओ आहे एका काश्मिरी तरुणीचा. या व्हिडिओमध्ये ती मुलगी मराठी गाणे गुणगुणताना दिसत आहे. यामधून मराठी भाषेबद्दल असलेले प्रेम व्यक्त होत असल्याची जाणीव ही संपूर्ण महाराष्ट्राला होते.

या तरूणीचे नाव शमीम अख्तर असून ती रूणझुणु रुणुझुणु रे भ्रमरा… हे गाणं गाताना दिसत आहे.  राज ठाकरेंनी हा व्हिडिओ शेअर करत मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

तसेच ठाकरेंनी त्यांच्या पक्षातर्फे कवी कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्ताने पोस्ट टाकत त्यांना अभिवादन केल्याचे दिसत आहे.

शमीम अख्तरला मराठी भाषेबद्दल असलेला आदर हा राज ठाकरेंच्या मनी बसला. यामुळेच ठाकरेंनी हा व्हिडिओ शेअर केला असल्याचे सांगितले.

कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा…

Posted by Raj Thackeray on Wednesday, February 26, 2020

संत ज्ञानेश्वरांच्या अनेक रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदीनी त्या कळसास नेल्या. ह्यातलीच एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटण, हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर. तो वृद्धिंगत होवो आणि आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो.Chosen great works of Sant Dyaneshwar were immortalised by Pt Hridaynath Mangeshkar and Lata didi. Shamim Akhtar, a Kashmiri girl chose to render one of them with the infusion of Kashmiri musical instruments. By doing this, she has displayed a high regard for our Marathi ethos.#मायमराठी

Posted by Raj Thackeray on Wednesday, February 26, 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *