Sun. Aug 25th, 2019

राज ठाकरे आणि उत्तर भारतीय आज येणार आमनेसामने

0Shares

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज उत्तर भारतीयांची प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नेहमीच उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे यांनी भूमिका घेतलीय. त्यामुळे राज ठाकरे या कार्यक्रमात काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

कांदिवलीमध्ये हा कार्यक्रम होणार असून उत्तर भारतीयांच्या मंचावर राज ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज यांच्या स्वागताची उत्तर भारतीय महापंचायतीने जय्यत तयारी केली आहे.

राज ठाकरे हे नेहमीच उत्तर भारतीयांच्या विरोधात उभे असतात. उत्तर भारतीय टॅक्सीचालक, वाहन चालक आणि फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे ऐकले आहे.
मात्र असं असतानाही राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांशी संपर्क साधण्याचे ठरवले आहे.

“कोणत्याही मुद्द्यांवर आमचे विचार भिन्न असू शकतील परंतू कोणत्याही समाजाच्या मंचावर जाऊन आपले मत मांडणे हे काही गैर नाही” असं मत मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी व्यक्त केलं. “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जर आरएसएसच्या मंचावर जाऊ शकतात तर राज ठाकरे महापंचायतला का नाही जाऊ शकत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांचा हा निर्णय आगामी निवडणुकीशी जोडला जात आहे. उत्तर भारतीयांशी संपर्क साधण्यासाठी राज ठाकरे अशा संधीच्या शोधात होते. अशा प्रकारे, त्यांना हा प्लॅटफॉर्म सापडला. खरं तर राज ठाकरे यांना माहित आहे की महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना एकत्र न घेता सत्तेवर येणे सोपे नाही. मुंबई मेट्रोपॉलिटनपासून ते पुणे, नाशिक, विदर्भ येथे उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *