‘लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास द्या’

मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल हा महत्त्वाचा आणि दैनिक प्रवासाचा विषय आहे. त्यामुळे, सातत्याने मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहेत. आता, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही लोकल प्रश्नाला हात घातला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ज्या नागरिकांना, प्रवाशांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, त्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.
कोरोनाचे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधात सूट देण्याचा विचारही असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे. त्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे लोकलची मागणी केली आहे.