Tue. Jun 28th, 2022

पुण्यात राजगर्जना

राष्ट्रगीताने राज ठाकरे यांच्या सभेची राष्ट्रगीताने सांगता झाली.


दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आंदोलन करायला घाबरू नका, असा सल्ला दिला आहे. तसेच आंदोलन सुरू ठेवा विधिविभाग मदत करेल, असेही राज ठाकरे म्हणाले.


‘गाफील राहिलात तर भोंगे पुन्हा सुरू होतील’
भोंग्याचे आंदोलन थांबता कामा नये – राज


महाराष्ट्रातील अनेक मुद्दे ताटकाळत आहेत. मात्र, राज्यातील मूळ मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना चर्चा नकोय, असा टोला राज ठकारेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.


पवारांसोबत राहून शिवसेना बाळासाहेबांची अप्रतिष्ठा करतेय, असा घणघातही राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला आहे.


औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमच्य नेत्यांनी नतमस्तक केल्याने नाव वाद निर्माण झाला. ओवैसी कबरीवर गेल्यामुळे महाराष्ट्र उफळेल असं वाटलं होतं. मात्र, महाराष्ट्र याप्रकरणी शांत आहेत. तसेच पवारांना औरंगजेब सुफीसंत वाटतो अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच पवारांनी अफझलखानाचे उदात्तीकरण केले असल्याचेही राज ठाकरे म्हणाले आहेत.


धृविकरणासाठी एमआयएमचा राक्षस उभा केला – राज


राज ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतरावरून राज्य सरकारवर टोला लगावला आहे. नामांतर  गरज नाही सांगणार  कोण लागून गेले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी यावेळी केंद्र सरकारला औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची विनंतीसुद्धा केली.


आंदोलनावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आंदोलन केल्याचा एक तरी खटला आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.


मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच याआधीही राज ठाकरे यांनी अनेक मुद्य्यांसाठी आंदोलने केली आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आम्ही यशस्वी आंदोलन करतो, तसेच मी कुठलंही आंदोलन अर्धवट सोडत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.


मागील काही दिवसांमध्ये मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे. राणा दाम्पत्य आणि शिवसेना हा वाद गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच रंगला होता. मात्र, आता खासदार नवनीत राणा आणि संजय राऊत लडाखमध्ये एकत्र फिरत आहेत. त्यामुळे राणा आणि राऊत लडाखमध्ये गोड बोलतात, हे शिवसेनेच्या लोकांना खुपत नाही, असाल सवाल राज ठाकरे यांनी उपस्थि केला आहे.


विरोधकांचे हिंदुत्व खोटे आहे – राज


मातोश्री काय मशीद आहे का? – राज


गुजरातमधून उत्तर भारतीयांना हुसकवले
गुजरात प्रकरणी कोण माफी मागणार? – राज


माफी मागण्याचा मुद्दा आत्ताच कसा आला ? – राज


मी संघर्ष टाळला – राज ठाकरे


मुलायमसिंग सरकारने कारसेवकांची प्रेते शरयूत टाकली – राज ठाकरे


अयोध्या दौऱ्यावर सुरू वाद हा सापळा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला सापळ्यात अडकायचे नाही म्हणून दौरा रद्द करण्यात आला.


अयोध्या दौरा मनसेने स्थगित केल्यामुळे काहींना आनंद झाला, मात्र काहींना दु:ख झालं.


राज यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया ५ जून रोजी.


१ जून रोजी राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया


राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. निवडणूक नसताना कशाला भिजत भाषण करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


राज ठाकरे यांचा हार घालून, पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना रामाची मूर्ती देत जय श्री राम अशी घोषणा करण्यात आली. 


राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित.


राज ठाकरे सभास्थळी दाखल.


राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासह अनेक मुद्द्यांवर बोलणार आहेत, असे पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले आहे.


राज ठाकरे सभेसाठी रवाना झाले आहेत.


गजानन काळे यांच्या भाषणाला सुरूवात – 

गजानन काळे यांनी धर्मवीर चित्रपटावर भाष्य केलं. धर्मवीरचे प्रमोशन कुणी केलं? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच म्हणाले, उद्धवजी आम्हाला राज साहेबांमध्ये बाळासाहेब दिसतात. मुख्यमंत्री हे टोमणेसम्राट आहेत. तसेच यावेळी गजानन काळे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधा. राऊतांना दिवसांधळेपणा सुरू झाला असल्याची टीका काळे यांनी केली आहे.


मनसे नेत्यांच्या भाषणाला सुरूवात झाली.


थोड्याच वेळात राज ठाकरे सभास्थळी रवाना होणार.


अमित ठाकरे सभास्थळी दाखल.


सभेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.


सभेसाठी मनसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


मनसैनिकांची सभेसाठी जमायला सुरूवात झाली आहे.


सभेला पोलिसांच्या अटी-शर्तींसह परवानगी

  • समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत.
  • सभेत रूढी, परंपरा, वंश यावरून चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • सभेच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी.
  • कार्यक्रमात शस्त्र, तलवारी बाळगू नये, कायदेशीर नियमांचे पालन करावे.
  • सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असेल.
  • सभेचे नियम कळवण्याची जबाबदारी आयोजकांवर असेल.
  • व्यासपीठावरील संख्या निश्चित असावी आणि ती पोलिसांना कळवावी.
  • स्वागत फलकामुळे रहदारीला अडथळा होऊ नये.
  • कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका तसेच वाहनांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • सभेला येणाऱ्या महिला आणि लहान मुलांसाठी व्यवस्था असावी.

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी १० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील राज यांच्या सभेत निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.