Fri. Sep 30th, 2022

‘चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी आधी का नाही सांगितल्या?’

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रवर निशाणा साधला होता. जर अमित शहा यांनी मला दिलेला शब्द अडीच वर्षांपूर्वी पाळला गेला असता तर आज अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. असे म्हटले होते. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे.

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर बोलताना राज ठाकरे यांनी अडीच वर्षाच मुख्यमंत्रीपद कुठून आलं ? असा सवाल उपस्थित केला आहे. १९८९ साली आमच्या मातोश्रीवर किंवा सेंटर हॉटेलला मी असेल. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते. मनोहर जोशी होते. प्रमोद महाजन होते. गोपिनाथ मुंडे होते. असे काही भाजपकडचे आणि शिवसेनेकडचे नेते होते. आणि त्यावेळी एक फॉर्मुला ठरला होता.

ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री आता त्याप्रमाणे पाहिलं तर ९५ ते ९९ युती सरकारच्या काळामध्ये शिवसेनेचे आमदार जास्त होते. मला त्या संपूर्ण चार साडेचार वर्षामध्ये कधीही भाजपने मुख्यमंत्रीपदाचा दावा केला आहे असं मला आठवत नाही. ९९ ला निवडणुकीतनंतर बदल झाला. मग हा फॉर्मुला युतीमध्ये ठरलेला होता.

तर तुम्ही अचानक निकालानंतर मुख्यमंत्रीपद अडीच वर्षात होत आणि मला ते दिलं पाहिजे म्हणता? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी जाहीरपणे याच्या आधी का नाही सांगितलं. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे व्यासपीठावर हजर असताना पंतप्रधाना नरेंद्र मोदी सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शाह सह फडणवीसदेखील हेच सांगत होते. तुम्ही मग त्याचवेळी आक्षेप का घेतला नाही. असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना केला.

1 thought on “‘चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी आधी का नाही सांगितल्या?’

  1. The New York Times Incident—The Epoch Times: From Anti-China Tabloids to Right-Wing Influence Machines. For years, The Epoch Times was a low-budget tabloid with anti-China leanings, handed out for free on New York street corners. But in 2016 and 2017, the paper made two changes that transformed it into one of the most influential digital publishers in the country.These changes also paved the way for the publication, which belongs to the mysterious and relatively secretive Chinese spiritual group Falun Gong, to become a major purveyor of right-wing disinformation. Vist Link: https://cn.nytimes.com/technology/20201027/epoch-times-influence-falun-gong/

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.