Tue. Dec 7th, 2021

राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते- मुख्यमंत्री

मुंबईत आयोजित केलेल्या भाजपाच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामांचा पाढा वाचत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होते. भाजपाच्या महिला मेळव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय नारीशक्ती मोदींच्या पाठीशी असल्याचे म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या भाषाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीमधून येते म्हणून त्यांच्या भाषाने विचलित होऊ नका असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर टोला ?

राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट सध्या बारामतीमझून येत असल्याचे त्यांनी ं म्हटलं.

राज ठाकरे हे फक्त कलाकार आहेत.

राज ठाकरे १२ वा खेळाडू ही नाहीत आणि नॉन प्लेयिंग कॅप्टनही नाहीत.

मनसेचा एकही आमदार, खासदार, नगरसेवकही निवडू आणता येत नाही.

त्यामुळे लोकांनी त्यांच्या भाषणाला दुर्लक्ष करावे असा मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला आहे.

शनिवारी मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी त्याचेच प्रत्युत्तर आज दिले असल्याचे समजते आहेत.

मुख्यमंत्री भाषाणात काय म्हणाले ?

शेवटचा एक रुपयाही सामान्य माणसापर्यंत पोहोचतो आहे.

मोदींच्या नेतृत्वात शक्तिशाली भाराताची निर्मिती केली आहे.

५० वर्षातील कामं पाच वर्षात केली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मोदींनी विकासातले अडथळे दूर केले आहेत.

महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती ४५ जागा घेतल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *