Sat. Jul 31st, 2021

लाव रे तो व्हिडीओ; मुंबईत पून्हा राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात सभा घेत आहे.  मुंबईतील पाहिली सभा आज काळाचौकी परिसरात झाली. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसली तरी मात्र मोदींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी सभा घेत आहेत. दक्षिण मुंबई हा मतदार संघ मुंबईतील महत्वाचा मतदारसंघ असल्याने मुंबइतील पहिली सभा कोलाचौकी येथे झाली.भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.शहीद जवानांच्या जीवावर मत मागत असल्याचा आरोप लावला. मुकेश अंबांनीनी देवरांना पाठिंबा देणं म्हणजे देशाला मोठा संदेश असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

मुख्यमंत्र्यांनाही थोडी विश्रांती देण्यासाठी दोन दिवस विश्रांती घेतली

माझ्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडे नाहीत कारण मोदींनी एवढं खोटं बोललं आहे की उत्तर देणंं कठीण आहे.

आता माझ्या जुन्या क्लिप बाहेर काढत आहेत. काँग्रेस नालायक होती म्हणून तुम्हाला आणलं पण तुम्ही पण नालायक निघाले.

काँग्रेसचे देखील मी वाभाडे काढले कारण ते तेव्हा सत्तेत होते.

माझ्या प्रश्नाची उत्तर देता येत नाहीत त्यामुळे ‘ मी शरद पवार यांचा पोपट आहे ‘ असं बोलतात.

मोदींना शरद पवारांमध्ये गुरू दिसायचे आणि आता त्यांच्यावर टीका करतात.

देशात इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या उद्योजकाने जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.

मोदींनी शपथ विधीसाठी नवाज शरीफ याना बोलावलं काय वाटलं असेल जवानांच्या कुटुंबियांना?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सांगतायत की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे. का सांगतोय,यांना काय घडवायचं आहे.

श्रीलंकेत बॉम्बब्लास्ट झाला तर आतंकवाद संपवायचा असेल तर भाजपला मतदान करा अस बोलत आहेत.

भाजपला ऐतिहासिक बहुमत लोकांनी दिल. पण भाजप फक्त खोटं बोलत राहील आहे.

देशात गुन्हे वाढले, बलात्कार वाढले, देशात 2016 ला 38 हजार बलात्कार झाले.

अमोल यादवने पहिलं विमान बनवलं आणि आज तो देश सोडून जायला निघाला आहे.

जेट एअरवेज आज बंद झाली. एका रात्रीत 50 हजार बेरोजगार झाले,पण सरकार आणि पंतप्रधान यांनी काहीही केलेलं नाही.

जास्त पैसे मोजून अनिल अंबानी यांच्यावर कर्ज असूनही त्यांना राफेलचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं.

मी दोन वर्षे आधीच बोललो होतो की निवडणुकीच्या वेळी युद्धासदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *