राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केल्याच मनसेकडून सांगितले जात आहे. राज ठाकरे यांना पायाला दुखापत झाली होती. याचा त्रास त्यांना दीड ते दोन वर्षांपासून जाणवत होता. त्यामुळे त्यांने पुण्याचा दौरा देखील अर्धवट सोडून माघारी परतले होते. या दुखण्याचा त्रास जास्त जाणवायला लागला आहे. त्यामुळे ते पुण्यात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत त्यानंतर अयोध्याची पुढची तारीख निश्चित करणार असल्याची माहीती सुत्रांकडून देण्यात आली आहे. परंतू या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. दरम्यान, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.
काय आहे प्रकरण ?
राज ठाकरे यांनी भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे राजकारण चांगलचं तापलं होतं. त्यांनी भोंग्याच्या भूमिकेवरून सरकारला अल्टिमेटम दिला होता. यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्यात जाणार असल्याची घोषणा केली होती. पण राज ठाकरे यांच्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी आव्हान दिले. राज ठाकरे यांनी अयोध्यात येण्यापूर्वी उत्तरभारतीयांची माफी मागावी अन्यथा अयोध्येत पाय ठेवून देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता. अखेर स्वत: राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचा अधिकृतरित्या जाहिर केलं आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022