Wed. Aug 10th, 2022

 “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात” – राज ठाकरे

नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. . पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांची गेल्या 5 वर्षांतील पहिली पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधाव मोदींवर राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला.  “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”,  असे  ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.  मोदींनी कुठल्याही प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत त्यामुळे मोदींवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राज ठाकरे यांनी सभा घेत मोदींचे व्हिडीओ दाखवत सडेतोड टीका केली आहे.

राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती.

या पत्रकार परिषदेत मोदी व्यासपीठावर होते पण पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे शहांनी दिली.

ही पत्रकार परिषद पक्षाध्यक्षांची असल्याने मी बोलणं योग्य नाही. असे कारण मोदींनी दिले.

मोदींच्या उत्तरे न देण्याने त्याच्यावरती सर्वच स्तरातून टीका होत आहे.


मोदींवर सतत टीका करणारे राज ठाकरेंनी देखील मोदींवर ट्विटद्वारे निशाणा साधला.

“पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात” असे राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.