राज ठाकरे बांधणार 500 आदिवासी जोडप्यांच्या रेशीमगाठी

मराठमोळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. परंतु या विवाहसोहळयानंतरही कृष्णकुंजवर लग्नाची लगबग सुरूच आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या मुलाच्या विवाहानंतर 500 आदिवासी मुला-मुलींचं विवाह स्वखर्चाने लावून देणार आहे. या सामुदायिक सोहळ्यात स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार आहेत. मनसेच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
#शेतकऱ्यांचीमनसे🌱 #कामगारांचीमनसे✊ pic.twitter.com/VFKpAVdgDa
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 7, 2019
काय आहे नियोजन ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालघर जिल्ह्यातील शेतकरी,गरीब आणि आदिवासी समाजातील 500 मुला-मुलींच्या सामुदायिक विवाहसोहळयाचे आयोजन करत आहे.
येत्या 9 फेब्रुवारीला हा विवाहसोहळा संपन्न होणार.
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे खैरपाडा मैदानात सकाळी 10.30 पासून विवाहसोहळा सुरू होईल.
या विवाहसोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ही सहभागी होऊन सर्व वधू- वरांना आशीर्वाद देणार.
‘राज’पुत्रांचा विवाहसोहळा सुरळीत पार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा 27 जानेवारीला पार पडला.
फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्यासोबत अमित ठाकरेंचे लग्न झाले.
शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे हे आपली पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांसह उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,सुनिल तटकरे, पंकजा मुंडे यांसोबत बॉलिवूडमधील प्रतिष्ठीत कलाकारांनीही उपस्थिती लावली.
या ‘राज’पुत्राच्या विवाहसोहळ्याची चर्चा देशभर रंगली होती.