Breaking News

राज ठाकरे त्यांच्या वक्तव्यावर ठाम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हनुमान जयंतीनिमित्त पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीदिनी पुण्याच्या खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये त्यांनी महाआरती केली. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली गेली. या टीकेला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ‘३ मे’ च्या अल्टिमेटमवर मनसे ठाम आहे, मी भूमिका मागे घेतलेली नाही असं वक्तव्य या वेळी राज ठाकरे यांनी केले आहे.

तर, यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ‘भोंग्याचा विषय धार्मिक नाही, तर सामाजिक आहे’ , त्यामुळे राज्यात हाणामारी नको, शांतता भंग करण्याची गरज नाही असंही राज ठाकरे म्हणालेत. मशिदीसमोर भोंगे असल्यास त्यांच्यावर कारवाई नाही मात्र, आम्ही हनुमान चालिसाचे भोंगे लावल्यावर कारवाई होणार असं शासन का ? असा प्रश्न ठाकरेंनी विचारलाय. मशिदीचे भोंगे ४ वेळा लावले जातात तर आम्ही दिवसातून ५ वेळा हनुमान चालिसा लावणार असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. याबरोबरच , ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत घोषित केलं आहे. तर, १ मे , महाराष्ट्रदिनी ते औरंगाबादमधील संभाजीनगर येथे सभा घेणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातुन चर्चेला उधाण आलं आहे. आता महाराष्ट्रदिनी संभाजीनगरमध्ये राज काय म्हणतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

manish tare

Recent Posts

भारताच्या खात्यात आत्तापर्यंत ५५ पदकं

कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध सहज विजय…

12 hours ago

जबरदस्तीने धर्मांतर

अहमदनगर जिल्ह्यात एका हिंदू महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवधिकार परिषेदेने उघडकीस…

12 hours ago

पुढील चार दिवस धोक्याचे

मुंबईमध्ये रविवारचा संपूर्ण दिवस मुंबई उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची संततधार होती. उपनगरांमध्ये…

14 hours ago

टीईटी घोटाळ्यात सत्तारांच्या मुली

सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते…

14 hours ago

संजय राऊतांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

संजय राऊतांची २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात कारवाई कऱण्यात आली…

15 hours ago

मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

बरेच दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता काही मंत्र्यांचा…

15 hours ago