Sun. Jul 12th, 2020

दुष्काळी दौरा करणार नाही – राज ठाकरे

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 10 ते 12 सभा घेत मोदी आणि भाजपा सरकारवर टीका केली. आज ठाण्यातही पत्रकार  परिषद घेवून सरकारवर टीका केली आहे. राज्यात असणारी दुष्काळाची स्थिती आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी या पत्रकार परिषदेतून पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. यामध्ये अनेक मुद्यांवर राज ठाकरे यांनी  पुन्हा मोदींवर टीका केली आहे. राज ठाकरें आणि मनसेकडून  महाराष्ट्रातील दुष्काळाची माहिती घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.

काय म्हणाले राज  ठाकरे ?

आंबा विक्रीचा पहीला अधिकार हा शेतकऱ्यांचाच आहे.

सरकार कुणाचही असो चुकीच्या गोष्टींवर टीका व्हायलाच पाहिजे.

मी मराठा आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना भेटेन.

मराठी मुलांना प्राधान्य द्या आरक्षणाची गरज पडणार नाही.

आरक्षणाबाबत सरकारने  विद्यार्थ्यांना फसवलं आहे.

दहशतवाद हा दहशतवाद असतो, दशतवादाला काही धर्म नसतो.

आमिर खान चांगलं काम करतायेत, मग सरकार का नाही ?

सरकारचे काम इतरच करतायेत आम्ही कधी सरकारचं अभिनंदन करायचं ?

नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही. मोदींवर टीका केली आहे.

दुष्काळी दौरा करणार नाही. माध्यमांनीच तसं जाहीर केलं.

सरकार दुष्काळासंदर्भात गंभीर नाही मोदींनी देश भक्तीचे प्रमाणपत्र देऊ नये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *