Thu. Sep 29th, 2022

राजापूर रिफायनरी पुन्हा चर्चेत

रत्नागिरी येथील राजापूरमधील ग्रीन रिफायनरीबाबत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. बरसू सोलगावची जागा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राबद्दल नाराजी व्यक्त करत थेट भेटीसाठी वेळ मागितली आहे. आपली बाजू मांडण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी ‘मध्यस्थ नको, थेट भेट हवी’ असा आग्रह धरला आहे.

दरम्यान, बारसू येथे रिफायनरीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीच चर्चेसाठी वेळ हवी आहे असा आग्रह विरोधकांनी या पात्रातून धरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.