Sat. Feb 27th, 2021

मी गरीब आहे; दीड लाख घरांबाहेर लागले फलक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राजस्थानमध्ये गरिबीची थट्टा उडवणारी एक घटना घडली आहे. जयपूरजवळ 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दौसामध्ये दीड लाख घरांच्या बाहेर ‘मी गरीब आहे,’ असे

फलक लावण्यात आले आहेत.

 

दौसा जिल्हा परिषदेकडून दीड लाख घरांच्या बाहेर लोकांच्या गरिबीची चेष्टा करणारे फलक लावण्यात आले आहेत.

 

कोणकोणत्या घरांना अनुदानित अन्नपुरवठा केला जातो, हे ओळखण्यासाठी तब्बल दीड लाखांबाहेर ‘मी गरीब कुटुंबातील आहे.

 

मी अनुदानित अन्नधान्य घेतो,’ असा मजकूर असलेले फलक लावण्यात आलेत.

 

या फलकांच्या खाली त्या घरामधील व्यक्तीचे नाव लिहिण्यात आले आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होते

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *