Tue. Jun 18th, 2019

#IPL2019 कोलकाताची 8 गडी राखून राजस्थानवर मात

10Shares

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने विजय मिळवला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडीयममध्ये झालेल्या सामन्यात कोलकाताने 8 गडी राखून विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 140 धावांचे आव्हान पूर्ण करत त्यांचा पराभव केला. कोलकाता संघाच्या ख्रिल लिन आणि सनील नरिन यांनी या सामन्यात आपली चांगली कामगिरी बजावत कोलकाताला विजय मिळवून दिला.

कोलकाताचा ‘रॉयल’ विजय –

कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

राजस्थान रॉयल्सने कोलकातापुढे 140 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचे पाठलाग करताना ख्रिल लिन आणि सुनील नरिन यांनी धडाकेबाज फलंदाजी करत हा सामना जिंकला.

ख्रिलने अर्धशतक पुर्ण केले तर सुनीलने 47 धावा केल्या.

कोलकाताने 8 गडी राखून राजस्थानविरोधात विजय मिळवला आहे.

राजस्थान संघाच्या श्रेयस गोपाळने 2 बळी टिपले तर कोलकाता संघाचा हॅरी गुर्नेयने 2 घेतले.

हा रोमांचक सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडीयममध्ये पार पडला.

 

 

 

10Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *