Wed. Jan 20th, 2021

पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित लढणार

गेल्या वर्षी पोटनिवडणुकित भाजपचे राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा सुमारे 29 हजार मतांनी पराभव केला होता. तर या लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेनेची युती झाल्याने कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत.शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर पालघरची सीट शिवसेनेच्या वाट्याला आली होती.
खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना पालघरमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गावित यांच्या उमेदवारीची घोषणाच केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

गावित यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीसाठी गावित यांना उमेदवारी दिल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
खासदारकीची प्रत्येक जागा जिंकणं महत्त्वाचं असल्याने गावित यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीनिवासने विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने गावित यांना उमेदवारी देण्यात आली.
जागा वाटपात जागाही मिळाली आणि उमेदवारही मिळाला, असं पहिल्यांदाच घडलं असेल
श्रीनिवासला संसदेत पाठवण्याचा माझा शब्द कायम आहे.
त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थिती विधानसभेत पाठवण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी यांनी सांगीतलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *