Wed. Jun 29th, 2022

राजेश टोपेंची शिवसेना नेत्यांवर नाराजी

महाविकास आघाडी सरकारमध्ये सतत काही न् काही खटके उडत असाताना दिसतात. अशातच आता, राज्याचे आरोग्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. राजेश टोपे म्हणाले, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून सत्तेच्या बळाचा वापर करून कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या अशा वागणुकीमुळे राजेश टोपेंनी राष्ट्रवादीच्या औरंगाबाद कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली आहे.

राजेश टोपे म्हणाले, शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करत शिवसेनेत घेऊन जात आहेत. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. तसेच शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तेच्या बळावर फोडाफोड करू नये, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, आता राजेश टोपे यांच्या शिवसेना नेत्यांवरील नाराजीवर शिवसेनेकडून काय उत्तर मिलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.