Tue. Sep 28th, 2021

महाराष्ट्रात टाळेबंदी पुन्हा वाढणार

महाराष्ट्रातील टाळेबंदी वाढवणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट टाळेबंदी हटवली जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचं मत टाळेबंदी लगेच मागे घेऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्यानं सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. राज्यातील टाळेबंदी १ जूननंतरही कायम राहणार आहे. मात्र, काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *