Sat. Jul 31st, 2021

कोण वाटतं रजनीकांतला ‘शक्तिशाली’?

अभिनेते रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचाली विषयी संकेत मिळू लागले आहे. “जर 10 पक्ष एका व्यक्तिविरोधात एकत्र येत असतील, तर कोण अधिक शक्तिशाली आहे, हे आपोआप समजून येते.” असे सांगत सध्याच्या भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वांत शक्तिशाली असल्याचं रजनीकांत यांनी मान्य केलं आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केल्यापासून तामिळनाडूमधील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जायचे की महाआघाडीत सामील व्हायचे याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नाही.

मात्र रजनीकांतने याबाबतचे संकेत दिले आहेत. भाजपा हा खरोखरच धोकादायक पक्ष वाटतो का, असं विचारलं असता रजनीकांत म्हणाले, ” जर दहा पक्ष असा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी ते खरे असावे. मात्र सध्यातरी मोदी आणि भाजपाबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचा माझा विचार नाही. पण 10 पक्ष एखाद्या व्यक्तीविरोधात एकत्र येत असतील तर कोण अधिक शक्तिशाली आहे, हे तुम्ही समजू शकता.” रजनीकांत यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाबाबत त्यांचे विचार सकारात्मक असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *