Wed. Jun 19th, 2019

लोकप्रियतेमध्ये अजूनही रजनीकांतच ‘नंबर 1’!

0Shares

प्रसिद्ध अमेरिकन कंपनी ‘स्कोर ट्रेण्ड्स इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा सुपरस्टार रजनीकांतचंच सर्वाधिक फॅन फॉलोइंग असल्याचं स्पष्ट झालं आहे. या कंपनीने दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील कलाकारांच्या लोकप्रियतेसंदर्भात सर्वेक्षण करून त्यांच्या लोकप्रियतेचं रँकिंग केलंय.

रजनीकांतच ‘थलैवा’!

दक्षिण भारतीय सिनेमाचा चेहराच असणारे रजनीकांत म्हणजे तामिळमधील चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. मात्र त्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. आता त्यांच्या ऐन उमेदीचा काळ नाही. रजनीकांत सिनेमाव्यतिरिक्त कधीही मेक-अप करून फिरत नाहीत. ते अतिशय साधेपणाने राहतात. मात्र चाहते त्यांना अक्षरशः सुपरहिरोच मानतात.

गेल्या काही वर्षांत आलेल्या त्यांच्या शिवाजी द बॉस, ‘यन्धिरन’ (रोबोट), लिंगा, काबाली, काला, 2.0, पेट्टा या सर्व सिनेमांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यातील काही सिनेमे हे फारसे मनोरंजक नसूनही केवळ रजनीकांत यांच्यासाठी प्रेक्षकांनी ते पाहिले.

लोक अजूनही रजनीकांत यांचा सिनेमा पाहण्याआधी मंदिराबाहेर जशा चपला काढतात, तशा चपला काढून थिएटरमध्ये जातात.

चाहते पडद्यावर रजनीकांत आले की त्यांची अक्षरशः पूजा करतात.

एवढं प्रेम देशातल्या कोणत्याही अभिनेत्याला अजून मिळालं नाही.

त्यामुळे 5447 या भरभक्कम आकडेवारीमुळे रजनीकांत या ही वयात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.

 

कोण आहे नंबर 2?

मल्याळम सिनेसृष्टीतील heartthrob आणि हिंदीतील काही सिनेमांमध्ये झळकलेला स्टार पृथ्वीराज सुकुमारन लोकप्रियतेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

गेल्या 6 महिन्यांत त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याने दक्षिणेतील सिनेसृष्टीत त्याचा दबदबा पुन्हा निर्माण झाला आहे.

3 नंबरवर ‘बाहुबली’!

‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या सिनेमांनी केवळ तेलुगू सिनेमाचीच नव्हे,तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीची भाषा बदलली. एका वेगळ्या काळातील एवढा भव्यदिव्य सिनेमा, तो ही भारतीय संस्कृतीतला… असा प्रेक्षकांनी पाहिलाच नव्हता.

या सिनेमातील प्रमुख कलाकार प्रभास याची लोकप्रियता आभाळाला टेकलीय.

लोकप्रियतेच्या रँकिंगमध्ये तो आता तिसऱ्या स्थानावर आहे.

चौथ्या स्थानी ‘महेश बाबू’

तेलुगू सिनेसृष्टीतील देखणा कलाकार महेश बाबूची लोकप्रियता दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

त्याची स्टाईल दक्षिणेतील प्रेक्षकांना आवडते.

त्यातच त्याचा येऊन गेलेला ‘भारत अने नेनू’ आणि ‘महर्षी’ या सिनेमांमुळे त्याची लोकप्रियता शिगेला पोहचलीय.

अमेरिकेमध्येही मोठ्या प्रमाणावर फॅन्स असणारा महेश बाबू हा पहिला दक्षिण भारतीय कलाकार आहे.

पाचव्या स्थानावर ‘मोहनलाल’

दक्षिण भारतीय सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते ‘मोहनलाल’ नंबर पाचवर आहेत.

मल्याळम सिनेसृष्टीच नव्हे, तर सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं नाव असणारे ‘मोहनलाल’ लोकप्रियतेत पाचव्या नंबरवर आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: