Sat. May 25th, 2019

राजीव गांधींनी सहलीला युद्धनौकेचा वापर केला ? माजी नौदल प्रमुखांचा ‘हा’ मोठा खुलासा

0Shares
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील प्रचारसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी राजीव गांधींनी विराट युद्धनौकेचा वापर केला असल्याचा गंभीर आरोप लावला. मोदींच्या या आरोपामुळे देशात खळबळ माजली असून राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मात्र माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी हा आरोप फेटाळला आहे. तसेच बेट विकासाचे प्रमुख असल्यामुळे पाहणी करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वापर केला होता असे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले माजी नौदल प्रमुख ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे.
विराट युद्धनौकेचा वापर कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी वापरल्याचा आरोप मोदींनी प्रचारसभेत लावला आहे.
मात्र माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी मोदींनी लावलेला आरोप फेटाळला आहे.
राजीव गांधी बेट विकासाचे प्रमुख होते.
तसेच लक्षद्वीप बेटाच्या विकासाची पाहणी करण्यासाठी युद्धनौकेचा वापर केला असे माजी नौदल प्रमुख यांनी सांगितले आहे.
यावेळी राजीव गांधी यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनिया गांधी सुद्धा उपस्थित होत्या असेही स्पष्ट केले आहे.
त्यामुळे पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींविरोधात लावलेला आरोप तथ्यहीन असल्याचे एल. रामदास यांनी स्पष्ट केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *