Thu. Oct 21st, 2021

राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव, शिवभक्त नतमस्तक

राष्ट्रमाता जिजाऊंची 422 वी जयंती साजरी केली जात आहे. राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी जिजाऊंच्या जन्मगावी दाखल झाले.

सकाळपासूनच जिजाऊंच्या चरणी शिवभक्त नतमस्तक झाले.

यावेळी जय जिजाऊ असा जयघोष करण्यात आला.

माँ जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यकर्मांचे आयोजन करण्यात आले.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिंसांची प्रत्येक घटनेवर नजर ठेवून आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील राष्ट्रमाता जिजामाता यांना वंदन केले. यावेळी मंत्री राजेश टोपे, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

मागील काळात केंद्र आणि राज्य सरकारने न केलेली कामं आम्हाला करायची आहेत.

पुढील काळात मा जिजाऊंच्या जन्मभूमीत मोठं स्मारक व्हावं, अशी आमची इच्छा असून आम्ही त्या पद्धतीने काम करणार असल्याचं, सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *