Thu. Jun 17th, 2021

कोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड विरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण केलं. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील यावेळी उपस्थित होते.

कोविड -१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 2-डीजी औषध हा एक नवीन आशेचा किरण आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे कोरोना प्रतिबंधक औषध आहे.

 

काय आहे 2- DG औषध?

 • 2 – DG हे स्वदेशी कोरोना प्रतिबंधक औषध
 • हे पहिलं औषध जे कोरोना विषाणूचा प्रसार थांबवते.
 • औषध चूर्ण स्वरूपात असून पाण्यात विरघळून तोंडावाटे घेऊ शकता.
 • यामुळे, लसीकरणावरील ताण कमी होऊ शकतो. भारताचे चलन वाचू शकते.
 • 2-DG ला लागणारे घटक सहजगत्या उपलब्ध असल्याने मुबलक उत्पादन करणं शक्य
 • सौम्य आणि मध्यमच नव्हे तर तीव्र स्वरुपाच्या रुग्णांवर देखील वापरता येणार.
 • हे औषध लक्षण दिसताच अथवा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासून डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरता येणार.
 • 2 – DG औषध रुग्णांच्या शरिरातील संक्रमित पेशींपर्यंत पोहचून कोरोना विषाणूचा फैलाव थांबवू शकतं.
 • सदर औषध कोरोनाच्या विविध विषाणूंविरोधातही प्रभावी.
 • फुफ्फुसातील विषाणूच्या संसर्गावर गुणकारी
 • 2-DG या औषधाची दोन यशस्वी चाचण्यांच्यानंतर तिसरी चाचणी देशभरातल्या विविध राज्यांमधल्या 27 कोविड हॉस्पिटल घेण्यात आली.
 • तिसऱ्या चाचणीत रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाला. परिणामी रुग्ण लवकर घरी जाऊ शकले.
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी गुणकारी ठरले असून ऑक्सिजन कमतरतेवर प्रभावी ठरले आहे.
 • डीआरडीओला एप्रिल २०२०मध्ये याबाबत संशोधन करण्यास केंद्र सरकारने सांगितले होते.
 • अॉक्टोबर २०२० मधे 2-DGच्या चाचण्या सुरू झाल्या आणि सुमारे ७ महिन्यांनी औषध बाजारात येत आहे.
 • हे औषध DRDO अर्थात भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने तयार केले आहे.
 • यामुळे कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
 • सध्या 2-DGच्या १० हजार मात्रा तयार असून सोमवारी याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
 • या औषधामुळे भारताचे औषध निर्मितीच्या अब्जावधी डॉलर्सच्या बाजारातील विदेशी कंपनीवरील परावलंबित्व कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *