Mon. May 10th, 2021

काश्मीर पाकिस्तानचं होतंच कधी?, राजनाथ सिंग यांचा सवाल

कलम 370 रद्द झाल्यापासून हादरलेल्या पाकिस्तानने भारताला नामोहरम करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र पाकिस्तानच दरवेळी तोंडावर आपटलंय. तरीही काश्मीरवर अन्याय होत असल्याचा दावा करत पाकिस्तानचा पंतप्रदान इम्रान खान याने काळा दिवसही पाकिस्तानात साजरा केला. मात्र पाकिस्तानला कुणाचाच पाठिंबा मिळत नसल्याने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा पडलाय. त्यावरच निशाणा साधत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लेह येथील कार्यक्रमात पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले राजनाथ सिंग?

पाकिस्तानला मी विचारू इच्छितो, की काश्मीरच्या मुद्द्यावरून तुम्ही रडताय ते काश्मीर तुमचं होतं कधी?

काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग होतं, आहे आणि राहील.

भारताला शांतता हवी असून पाकिस्तान मात्र सातत्याने दहशतवाद पसरवतंय.

पाकिस्तानने आपल्या ताब्यातील काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचारांकडे लक्ष द्यावं.

कलम 370 हा भारताचा आंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे पाकिस्तानने इतर देशांकडे मदत मागूनही त्याला कुणी मदत दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *