Wed. Oct 5th, 2022

#VotingRound2 : रजनीकांतसह दक्षिणेतल्या ‘या’ सुपरस्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 पासून सुरुवात झाली असून देशातील 12 राज्यांमधील 95 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. राजकीय नेत्यांसह अनेक दिग्गज कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर सर्व भारतीयांनी मतदान करणं गरजेचे आहे, सर्वांनी मतदान करा,  असं आवाहनही केलं.

दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला –

दक्षिण भारतातील तामिळ सिनेसृष्टीत कलाकारांना विशेष महत्त्व आहे.

तामिळ जनता तेथील सुपरस्टार्सना देवाचा दर्जा देते.

त्यामुळेच अनेक कलाकारांची तिथे मंदिरं आहेत.

रजनीकांत, अजित कुमार, विजय यांसारख्या कलाकारांना तेथील जनता अक्षरशः डोक्यावर घेते.

त्यामुळे साहजिकच तामिळनाडूच्या राजकारणावरही तेथील कलाकारांचा प्रचंड प्रभाव आहे.

दक्षिणेतील राजकारणाला भाषिक अस्मिता आणि दिशा देणाऱ्या प्रमुख राजकारण्यांपैकी असणाऱ्या DMK यांसारख्या पक्षांमध्येही तामिळ चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाच भरणा होता.

Scriptwriter करुणानिधी, सुपरस्टार एम.जी.आर. यांच्यामुळे तामिळ जनता Kollywood कलाकारांना राजकारणी  म्हणून विशेष महत्त्व देऊ लागली.

अभिनेत्री आणि अनेकदा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या जयललिता यांच्यामुळे कलाकारांची तेथील राजकारणावरील पकड मजबूत असल्याचं दिसून आलं.

आजही तामिळ सिनेसृष्टीवर आपली जबरदस्त छाप असणारे सुपरस्टार कमल हासन, रजनीकांत, विजय यांनी राजकारणात उतरावं आणि सिनेमांतील हिरोंप्रमाणे जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा लोकांची आहे.

कमल  हासन आणि रजनीकांत यांनी काही काळापूर्वीच आपले स्वतंत्र राजकीय पक्षदेखील स्थापन केले.

त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या.

कमल हासन हे मोदी सरकारविरोधक म्हणून राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हं होती.

तर रजनीकांत यांनी वेळोवेळी मोदी यांचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं.

कमल हासन, श्रुती हासन

‘उलगनायगन’ म्हणून गौरवलेले कलाकार कमल हसन यांनी आज मतदान केलं.

त्यांची थोरली मुलगी अभिनेत्री श्रुती हसन हिनेदेखील मतदान केलं.

रजनीकांत

तामिळ सिनेसृष्टीत देवाचा दर्जा असलेला आणि सर्वाधिक फॅन फॉलोइंग असणारे ‘थलैवा’ रजनीकांत यांच्याकडून जनतेला कायमच खास अपेक्षा असतात.

पडद्यावर अनेक चमत्कार करणारे रजनीकांत हे प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या साधेपणाबद्दलही तितकेच लोकप्रिय आहेत.

आज त्यांनी चेन्नईमधील स्टेला मेरिस कॉलेज येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.

विजय

‘इतलथलपती’ असं बिरूद मिरवणाऱ्या विजय या Kollywood सुपरस्टारनेदेखील ‘सरकार’, ‘मेर्सल’ या गेल्या काही सिनेमांमधून झंझावाती राजकीय मतप्रदर्शन केलं.

त्यामुळे विजयच्याही राजकीय प्रवेशाकडे तामिळ जनतेचं लक्ष लागलं आहे.

मात्र विजयने अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही.

आज त्यानेही अत्यंत साधेपणाने मतदानकेंद्रावर रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.

अजित कुमार

रजनीकांत आणि विजय यांच्याइतकीच अफाट लोकप्रियता असणारा अभिनेता म्हणजे ‘थला’ अजित.

मात्र आपल्या राजकीय भूमिकेबद्दल अजित फारशी वाच्यता करत नाही.

मतदानासाठी अजित मतदानकेंद्रावर दाखल होताच एकच झुंबड उडाली.

यामुळे पोलिसांपुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

मात्र खुद्द अजितने पोलिसांना सहकार्याची भूमिका घेतली.

मतदान करून त्यानंतर बाहेरील गर्दीला अभिवादन करून अजित मतदानकेंद्रावरून निघून गेला.

सूर्या

अभिनेता सूर्या, त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका, त्याचा भाऊ अभिनेता कार्थी, यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

उमेदवार म्हणून हे कलाकार उभे राहतील, अशी जनतेची खूप अपेक्षा असली, तरी आज लोकसभा निवडणुकीत हे सुपरस्टार्स अतिशय सामान्य जनतेमध्ये उभे राहून मतदान करताना दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.