Thu. Sep 29th, 2022

लोकसभा निवडणुकीतून रजनीकांत यांची माघार

अभिनेता रजनीकांत आगामी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची चर्चा केली जात होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीतून रजनीकांत यांनी माघार घेतले असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सुपस्टार रजनीकांत यांचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये पाण्याची मोठी समस्या असल्याने नागरिकांनी या प्रश्नांवर तोडगा काढणाऱ्या पक्षालाच निवडून आणावे असेही त्या पत्रकात म्हटलं आहे.

रजनीकांत यांनी पत्रकात काय म्हटलं ?

आगामी लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेतली आहे.

तसेच माझा पक्ष रजनी मक्कल मंद्रम सुद्धा सहभागी नसणार आहे.

लोकसभा निवडणुकांऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचे लक्ष आहे असेही त्यांनी सांगितले आहे

आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

कार्यकर्त्यांनी पक्षाचं चिन्हं, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर इतर पक्षाच्या प्रचारासाठी करू नये.

सुपरस्टार निवडणुक लढणार नसल्याने त्यांचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.