Sun. Apr 18th, 2021

माझ्या ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्र्यांनी न दिल्यास मी जनआक्रोश करणार – राजू शेट्टी

राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांने 11 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास आणि आम्ही जनतेपर्यंत पोहचू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री जनादेश यात्रा घेऊन राज्यतील विविध भागात जाणार आहेत. पाच वर्ष पूर्ण झाले म्हणून स्वतःची पाठ मुख्यमंत्री स्वतःच थोपटत आहेत. अशी टीका माझी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

पत्रकार परिषद घेत त्यांना मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. यामध्ये त्यांनी 11 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास आणि आम्ही जनतेपर्यंत पोहचू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना 11 प्रश्न

पुण्यात कोंढवा दुर्घटना प्रकरणी काय झालं. कामगार कल्याण मंडळाचे दहा हजार कोटी कुठं गेले?

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्याची पक्ष आयात बद्दल बोलणार का ?

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एस टी बी टी बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू याच उत्तर मुख्यमंत्री तुम्ही देणार आहात का ?

पीक विमा सर्व्हेच काय झालं? त्यामध्ये असलेल्या कृषी महसूल विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही?

शिवसेनेन मोर्चा काढला, मात्र त्याच्यावर नियत्रंणासाठी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे?

मुख्यमंत्र्याचे सहकारी सुभाष देशमुख,पंकजा मुडे,राधाकृष्ण विखे पाटील यांनी थकवलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देणार का?

धनगर समाजातील लोकांना एस.टी.चा दाखला देऊ असं अश्वासन दिले होते,पण पाच वर्षात ते आतापर्यत मिळाले नाहीत.

लिंगायत समाजातील कुठल्या लोकांना ओबीसी दर्जा देणार आहेत,स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या अशी त्याची मागणी आहे. मग ओबीसी करू हा अट्टाहास कोणासाठी केला जातोय?

गेले पाच वर्षात रोजगाराबाबत काय केले याच पण उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.

कृषी वीज जोडणी मध्ये शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारे वीज दर योग्य आहेत का ?

बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या लाभार्थ्यां बद्दल मुख्यमंत्री बोलतील का ? मंडळाचे पैसे लाभार्थ्यांला डीबीटी द्वारे पैसे देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देतील का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *