Sat. Jul 31st, 2021

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानसभा निवडणुकांवर चर्चा

विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. राजकिय नेते एकमेकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. राजकिय नेते एकमेकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हेदेखील उपस्थित होते.

राजू शेट्टीं आणि राज ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरेंच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी जवळपास एक तासांहून अधिक वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात भुमिका घेतली होती. त्याचप्रमाण् राजू शेट्टी देखील भाजपाविरोधात निवडणूक लढले होते.

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला तोंड देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं असं मत राज ठाकरे यांनी मांडल आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *