Thu. Dec 12th, 2019

राजू शेट्टींच्या मतदारसंघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजली

लोकसभा निवडणुकांच्या निकालात कोल्हापुर आणि हातकणंगले मतदारसंघाचा निकाल या ठिकाणच्या राजकारणात मोठा बदल करणारा ठरला. सलग 2 वर्ष खासदार असलेले राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांनी 95 हजार 765 मतांनी पराभव केला आहे. परंतु आता खासदार राजू शेट्टी यांच्या मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्याचा प्रकार उघड झाल्याच सांगण्यात येत आहे. हा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजू शेट्टींच्या मतदार संघात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते आढळली आहेत

अशी तक्रार खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्या मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्यात आली आहे.

हातकणंगले मतदार संघात 12 लाख 45 हजार 797 इतक्या लोकांनी मतदान केले होते.

मात्र मतमोजणीच्या दिवशी 12 लाख 46 हजार 256 इतकी मतांची मोजणी झाली आहे.

459 इतकी अधिकची मते आलीत कोठून असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

शेट्टी यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी केंद्रावर दिसून येणाऱ्या वायफाय बाबत आक्षेप घेतला होता.

त्यातच आता मतांच्या संख्येत वाढ दिसत असल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.

निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *