Tue. Jul 27th, 2021

ब्राह्मणसमाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि विद्यामान खासदार राजू शेट्टी यांना ब्राह्मणसमाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हातकणंगले येथील हेरले येथे एका प्रचारसभेत बोलत असताना ब्राह्मणसमाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले होते. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात राजू शेट्टी यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल  –

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ब्राह्मणसमाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले.

सीमेवर शेतकऱ्यांची पोरं जातात, कोणी देशपांडे, कुलकर्ण्यांची नाही असे वादग्रस्त वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं.

यामुळे विविध संघटनांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली.

तक्रार दाखल केल्यामुळे हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी राजू शेट्टींना नोटीस बजावली.

राजू शेट्टी यांनी 24 तासांत यावर खुलासा करावा, असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

मात्र राजू शेट्टींनी या नोटीसला उत्तर दिले नसल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *