दिलेला शब्द पाळता येत नसेल तर फुकटची पाटीलकी करू नका – राजू शेट्टी

दिलेला शब्द पाळता येत नसेल तर फुकटची पाटीलकी करू नका असा टोला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लागावला आहे. वीज सवलतीचा दिलेला शब्द पाळला नसल्याने त्यांनी हा टोला लागवला आहे. राजू शेट्टी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये नेहमी या ना त्या कारणावरून आरोप- प्रत्यारोप होतचं असतात.
नेमकं प्रकरण काय?
जानेवारी महिन्यात कृषी पंपाच्या वीजदर वाढीच्या प्रश्नावर महामार्ग रोको करण्यात आला होता.
यावेळी पंपाच्या वीजदर वाढी प्रश्नी चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्ती केली होती.
हा प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या आश्वासनावार हो रोको मागे घेण्यात आला होता.
मात्र यावर अजून कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.
अद्यापही वीज सवलतीचा दिलेला शब्द पाळला नसल्याने राजू शेट्टी यांनी असे आरोप केले आहेत.
तर 1 जुलै रोजी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा दिला आहे.