Sun. Aug 18th, 2019

ब्राम्हण समाजाविषयी आक्षेपार्ह विधानाप्रकरणी राजू शेट्टींची माफी

98Shares

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच असल्यामुळे राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्ज झाली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका प्रचार सभेत बोलताना ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी ब्राह्मण जागृती सेवा संघाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी ब्राम्हण समाजाची माफीही मागितल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

राजू शेट्टी यांनी एका सभेत ब्राम्हण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले.

सीमेवर शेतकऱ्यांची पोरं जातात. कुणा देशपांडे, कुलकर्णीची पोरं सीमेवर जात नाही असे विधान त्यांनी केले.

त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे समजते आहे.

तसेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी ब्राम्हण जागृती सेवा संघाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली.

ब्राम्हण समाजाची बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे म्हटलं आहे.

यासाठी राजू शेट्टी यांनी माफीही मागितली आहे.

ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल माफी मागत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

98Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *