Mon. Dec 6th, 2021

‘करून दाखवलं’ची होर्डिंग्ज काढून टाका, राजू शेट्टींचा टोला

खऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) कर्जमाफीचा फायदा होणार नसताना, ‘करून दाखवलं’ची होर्डिंग लावली कशाला, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhiman Shetakari Sanghatan) माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. तसंच शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल, तर चालू पीक कर्ज माफ करा अशी मागणी शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे.

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी 8 जानेवारीच्या देशव्यापी बंद मध्ये सहभागी होऊन सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावं असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे. सांगली मध्ये आयोजित शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी वरून बोलताना सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारकडून दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे,मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होत नाही.

जे आता शेतकरी राहिले नाहीत, ज्यांनी शेती सोडली आहे,त्यांना या योजनेचा फायदा होणार.
खऱ्या शेतकऱ्यांना जर फायदा होणार नसेल, तर तुम्ही शेतकरी कर्जमाफी (Loan waiving) केली म्हणून ‘करून दाखवलं’ ची होर्डिंग्ज लावली कशाला, असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

या मेळाव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चे नेते वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,पोपटराव मोरे,संदीप राजोबा यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *