Fri. Aug 12th, 2022

Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रात २४ वर्षांनी राज्यसभा निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानावर महाराष्ट्रातील मोठी सत्तासमीरणं अवलंबून आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी कंबर कसली आहे. अपक्षांनी निवडणुकीत मदत करावी असे प्रयत्न मविआ आणि भाजपकडून सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचा उमेदवर जिंकणार की विरोधी पक्ष भाजपचा? याची उत्सुकता आहे.


व्हिडीओ बघून आयोग भाजपच्या आक्षेपावर निर्णय घेणार.


केंद्रीय आयोगाने आक्षेपाची व्हिडीओ क्लिप मागवली.


मतमोजणी प्रक्रियेला तासभर विलंब.


केंद्रीय आयोगाकडून अद्याप निर्णय आलेला नाही.


राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणीला सुरूवात नाही


मतदानाच्या आक्षेपाच्या निर्णयापर्यंत विलंब.


मतमोजणी सुरू होण्यास विलंब होणार.


भाजपच्या आक्षेपावर केंद्रीय आयोगाची सुनावणी सुरू.


भाजपकडून जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप


मुख्यमंत्री विधानभवनातून निघाले.


राज्यसभेच्या मतमोजणीसाठी 5 वाजता सुरूवात होणार आहे.


शिवसेनेच्या सर्व आमदारांच मतदान पूर्ण.


सर्वपअक्षीय एकूण २७८ आमदारांचे मतदान पूर्ण.


रवी  राणा मतदान करण्यास विधानभवनाकडे रवाना.


चारही पक्षांचा विजयाचा दावा


अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यसभे निवडणुकीसाठी मतदान केले.


नवाब मलिक यांची नवीन याचिका स्विकारण्यास न्यायालयाने नकार दिला. नवाब मलिकांना मतदान करण्यास नाकारली असल्याची माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे.


 एकूण २६० सर्वपक्षीय आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे.


काँग्रेसच्या २ आणि राष्ट्रवादीच्या ३ आणदारांचं मतदान अद्याप बाकी आहे.


शिवसेनेच्या १७ आमदारांनी केलं मतदान


भाजपाच्या ८५ आमदारांचं मतदान पूर्ण


राष्ट्रवादीच्या ४७ आमदारांनी केलं मतदान


काँग्रेसच्या ४२ आमदारांचं आतापर्यंत मतदान पूर्ण


भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप विधानभवनात दाखल.


एकूण १८७ सर्वपक्षीय आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे.


नवाब मलिकांना मतदान करण्यास परवानगी नाही. – सूत्र


आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल.


तीनही पक्ष पहिल्या टप्प्यांत ४२ मतं देणार


मविआच्या आमदारांचं टप्प्या टप्प्यांत मतदान सुरू


काँग्रेसच्या २३ आमदारांचं मतदान पूर्ण


मलिक आणि देशमुखांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे – जयंत पाटील


मविआमध्ये नाराजी नसल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.


१४३हून जास्त आमदारांनी दीड तासात मतदानाचा अधिकार बजावला आहे.


विजय आमचाच होणार – वडेट्टीवार


काँग्रेसच्या ४० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच विधानभवनात दाखल होणार.


राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी देशमुख आणि मलिकांची उच्च न्यायालयात धाव.


अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे मविआची रणनिती बदलली आहे.


शिवसेनेचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत.


राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांकडून मतदान


मविआमध्ये विसंवाद असून त्याचा परिणाम मतदानावर होईल – प्रवीण दरेकर


राष्ट्रवादीचे नेते बनसोडे अद्याप मतदानासाठी पोहचले नाहीत.


इम्रान प्रतापगडी यांच्यासाठी काँग्रेसने मतांचा कोटा ४४ केला आहे. त्यामुळे आता शिसवेनेची गोची होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांची मतं धोक्यात येण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनेही मतांचा कोटा वाढवला.


शिवसेना आमदार मतदानासाठी अद्याप निघाले नाहीत.


चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असतानाही ऍम्ब्युलन्सने राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.


राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी राज्यसभेसाठी मतदान केले.


मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला.


काँग्रेसकडून मतदान प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले.


भाजपाच्या आठ आमदारांनी मतदान केले.


राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते मतदान करतील. राष्ट्रवादीचे राज्यसमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजवला आहे.


राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात.


Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.