Tue. May 11th, 2021

टिकैत यांचा केंद्रला आव्हान महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

गेल्या काही अनेक महिन्यापासून कृषी कायद्याविरोधात सिंघू बॉडरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप त्यावर काही तोडगा निघाला नाही. आज शेतकऱ्यांनी देशभर चक्का जाम करत कृषी कायद्यांचा निषेध नोंदवला. आता हे आंदोलन महात्मा गांधी यांची जयंती अर्थात 2 ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. ऑक्टोंबरनंतर आम्ही आमची पुढील योजना जाहीर करू असं म्हटलं आहे. त्यांनी केंद्र सरकारला आव्हान केलं आहे की, जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
कृषी कायदे रद्द केल्यानंतर आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्व सीमा बंद केल्या होत्या. मात्र शेतकरी आंदोलक मागे हटले नाही. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली होती शिवाय काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठ्या खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले होते. मात्र यावर उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी या खिळ्यावर फुलं लावणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाला अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय या आंदोलनाला काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी देखील पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *