Mon. Aug 19th, 2019

मोदींनी माझं ऐकलं आणि #Article370 रद्द केलं – राखी सावंत

0Shares

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं Article 370 भारत सरकारने रद्द केलं आहे. यासंदर्भात जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची स्वप्नपूर्ती झाल्याचं म्हटलं. हे जरी पंतप्रधानांनी म्हटलं असलं, तरी एक व्यक्ती आहे, जी असं म्हणतेय, की पंतप्रधानांनी माझ्याच सांगण्यावरून कलम 370 रद्द केलंय. ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून राखी सावंत ही आहे.

राखी सावंत ही नेहमीच या न त्या कारणाने चर्चेत राहायचा प्रयत्न करत असते.

वाटेल ते बोलण्याबद्दल तर ती लोकप्रिय आहे.

यावेळी तिने Instagram वर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये तिने मोदींचं कौतुक करताना पुन्हा एकदा अजब दावे केले आहेत.

 

मोदीजी, मला तुमचा अभिमान आहे. तुम्ही सर्वोत्तम आहात. तुमच्यासारखा कुणीच नाही. Article 370 वर येणाऱ्या सिनेमात मला भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक, निर्मात्यांना धन्यवाद. सर्वांत आधी आम्ही हा मुद्दा उचलला होता. माझं ऐकल्याबद्दल मोदींचे आभार’ असं तिने या म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *