Fri. Jun 21st, 2019

ड्रामा क्विन राखीला धोबीपछाड!

0Shares

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकते. पण एक असाच ड्रामा तिला चांगलाच महागात पडला. इतकामहागात की, यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले.

द ग्रेट खली याने हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल बॅनरखाली रेसलिंगची बिग फाईटचं आयोजन केले होते. यावेळी एका विदेशी महिला रेसलरला आव्हान देणं राखीला महागात पडलं.

विदेशी महिला रेसलरला इतका राग आला की, तिने राखीला हवेत उचलून थेट जमिनीवर आपटले. यानंतर राखीला थेट रूग्णालयात हलवावे लागले.

बिग फाईटदरम्यान विदेशी रेसलर रैवलने फाईट जिंकल्यानंतर ओपन चॅलेंज दिले, तिचे हे आव्हान राखीने स्वीकारले. यानंतर दोघांमध्येही लढत सुरू झाली. राखीही विदेशी रेसलरला डिवचतांना दिसली. हे सगळे पाहून विदेशी रेसलर रैवल चांगलीच संतापली आणि काही कळायच्या आत तिने राखीला अक्षरश: हवेत उचलून खाली आपटले. यानंतर राखी जोरात ओरडायला लागली. बाजूला उभे बाऊन्सर रिंगच्या आत आले आणि त्यांनी राखीला कसेबसे उठवले. राखीला पाठीत आणि पोटातील वेदना असह्य झाल्या. यानंतर तिला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले. तूर्तास राखीची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळतीये.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: