Thu. Sep 16th, 2021

कोरोना व्हायरस संपवायला, राखी सावंत निघाली चीनला

जगभरात कोरोना व्हायरसची (Corona Virus) दहशत आहे. भारताने आपले चीनमध्ये अडकलेले नागरिक भारतात परत आणले. मात्र या सगळ्यात ड्रामा क्वीन राखी सावंत मात्र चीनला निघाली आहे. तिने Instagram वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय आहे या व्हिडिओत?

राखी सावंत या व्हिडिओत एका विमानात बसलेली दिसत आहे. आपण चीनला जायला निघालो असून कोरोना व्हायरस संपवूनच आपण पुन्हा भारतात येऊ, असं वेडगळ विधान तिने या व्हिडिओत केलंय. ‘मी आता विमानात आहे. मी चीनला जाऊन कोरोना व्हायरस संपवूनच परत येणार आहे. त्यामुळे आता कोणीही आजारी पडणार नाही. ’

‘मोदीजी माझ्यासाठी प्रार्थना करा’

या व्हिडिओतच राखी सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे. ‘मोदीजी माझ्यासाठी प्रार्थना करा की, मी चीनहून सहसलामत पुन्हा भारतात येईन’ या हास्यास्पद विधानानंतर आणखी एक गमतीदार दावा राखी सावंतने या व्हिडिओत केला आहे. ‘मी कोरोना नष्ट करण्यासाठी NASA कडून स्पेशल औषध घेऊन जात आहे’ असं ती म्हणाली आहे.

‘चीनी मिनी चाऊ चाऊ, व्हायरस को खाऊ खाऊ’

राखी सावंत विमानातून उतरल्यावर आपण चीनला पोहोचल्याचंही सांगत आहे. तसंच आपला चेहराही चीनी लोकांसारखा दिसत असल्याचं तिने म्हटलंय. यापुढे ती ‘चीनी मिनी चाऊ चाऊ, व्हायरस को खाऊ खाऊ’ अशी अजब बडबडही करत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओला आधीच 75 हजारांपेक्षा जास्त views मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *