अभिनेत्री राखी सावंतने केली चाहत्यांना विनवणी

वादग्रस्त व्यक्तव्यामुळे अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी राखीने खुद्द चाहत्यांना एक विनवणी केली आहे. राखीने सोशल एक पोस्ट शेअर केली असून पोस्टमध्ये तिने तिच्या आईसाठी प्रार्थना करा असं चाहत्याना म्हटलं आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले असून फोटो शेअर करत तिने, ‘माझी आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले आहेत. एका चाहत्याने राखीच्या खासगी आयुष्यात इतक्या अडचणी असूनही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती असं म्हणत कमेंट केली आहे. बिग बॉसच्या घरात राखी सावंतने व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटाचा सामना करत असल्याचे सांगितलं होतं.‘बिग बॉस १४’च्या घरात राखी सावंतने चॅलेंजर म्हणून एण्ट्री केली होती. राखीने बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होतं. शिवाय तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला. मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी वापरणार असल्याचं राखीने फिनालेमध्ये स्पष्ट केलं होत.