Sun. Jun 20th, 2021

राखी सावंत पुन्हा एकदा लग्नाच्या मुद्द्यावरून चर्चेत

राखी सावंत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय चर्चेत असते. लग्नाच्या मुद्द्यावरून कायमचं राखी चर्चेत असते. बिग बॉस १४ मध्ये येण्याआधी राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे ती सातत्यानं चर्चेत होती. आता पुन्हा एकदा राखी सावंत तिच्या पतीमुळे चर्चेत आली आहे. राखी अनेकदा तिच्या पतीबद्दल बोलताना दिसते. मात्र आजपर्यंत तिच्या पतीला कोणीही पाहिलेलं नाही. राखीनं सुद्धा त्याच्यासोबतचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. त्यामुळे अनेकांना पब्लिसिटी स्टंट आहे. मात्र राखीनं सिद्धार्थ कननच्या शोमध्ये पती रितेशबद्दल भाष्य केलं.राखीनं आईची शपथ घेऊन आपल्या लग्नाचं सत्य सांगितलं आहे. राखीला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आलं की, खरंच तिनं लग्न केलं आहे की हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. त्यावर उत्तर देताना राखी म्हणाली, ‘माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते की, मी कधीच खोटं बोलणार नाही माझा पती आहे. मी खरोखरच लग्न केलं आहे पण माझा पती हा भारतात राहत नाही. तो परदेशात राहतो.’ या मुलाखतीत राखीनं सांगितलं की, पती रितेशसोबत तिचं नात आता कोणत्या पातळीवर आहे. राखी म्हणाली, ‘मला आता माहीत नाही की, मी सध्या कोणत्या स्टेजला आहे. लग्नाच्या जागी आहे की नाही. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मला माहीत नाही की, मी माझ्या पतीसोबत राहू शकणार आहे की नाही. आमचा घटस्फोट होईल किंवा नाही. तो सध्या कॅनडामध्ये आहे आणि मला अजून तिथला व्हिसा मिळालेला नाही.’ राखीनं या मुलाखीतीत सांगितलं की, तिला सध्या अनेक रिअलिटी शोच्या ऑफर मिळत आहे. जे रितेशसोबत मला या रिअलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी सांगत आहेत. मात्र राखीनं सांगितलं की, जेव्हा माझी आई पूर्णपणे ठीक होणार त्यानंतरच मी काम सुरु करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *