Tue. Jan 28th, 2020

हिमेशनंतर ‘या’अभिनेत्रीची राणू बरोबर काम करण्याची इच्छा

आता हिमेश नंतर अजून एका अभिनेत्रीने राणू बरोबर काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. ती अभिनेत्री म्हणजे राखी सावंत.

एक प्यार का नगमा है या गाण्यामूळे रातोरात स्टार झालेली रानू मंडलला हिमेश रेशमियाने गाणे म्हणण्याची संधी दिली. राणूचे हिमेश बरोबर तेरी मेरी कहानी हे गाणे प्रदर्शित झाले. त्यामागे लगेचच हिमेशने त्यांच्या दुसऱ्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

आता हिमेश नंतर अजून एका अभिनेत्रीने राणू बरोबर काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. ती अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी सावंतचे छप्पन छुरी हे नवीन गाणे आताच रिलीज झाले आहे. या गाण्याला राणूंनी आवाज द्यावा असे राखीला वाटते. या गाण्याची मुख्य गायिका मंदाकिनी बोरा यांचे आहे. या गाण्यात राखी सोबत मयुराक्षी बोरा आणि मोनिका सिंह  तर या गाण्याचे रिमीक्स राणूंनी म्हणावे, असे राखीचे म्हणणे आहे.

राणू मारीया मंडल या पश्चिम बंगाल मधील नाडिया जिल्ह्यात राहतात. राणू या त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कधी हाटबाजार तर कधी रानाघाट प्लॅटफॉर्मवर गाणे गायच्या. पण त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे आता त्यांचे जीवन पुर्णपणे बदलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *