Sun. Jun 16th, 2019

आता राखी म्हणतेय, ‘भाई मेरा बदला लो’

0Shares

राखी सावंत ही सध्या तिला कुस्ती चॅलेंजमध्ये झालेल्या दुखापतीमुळे जोरदार चर्चेत आहे. पंचकूलामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या सीडब्लयूई चॅम्पियनशीपमध्ये राखीने महिला रेसलर रोबेलचं कुस्तीचं चॅलेंज स्विकारलं होत. मात्र हे चॅलेंज राखीला चांगलच महागात पडलं. कुस्तीच्या आखाड्यात रोबेल या महिला कुस्तीपटूने राखीला उचलले आणि खूप जोरात खाली आपटले. यामध्ये राखीला अशी काही दुखापत झाली आहे की सध्या ती अंथरुणातून उठूच शकत नाही.

या कुस्तीदरम्यान घडलेल्या सगळ्या घटनांचे छोटे छोटे व्हिडिओ राखीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तसेच सध्या डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचा एक व्हिडिओसुद्धा तिने इन्स्टावर शेअर केला आहे. राखीच्या इन्स्टावरील एका व्हिडिओमध्ये ग्रेट रेसलर खली तिच्या तब्येतीची चौकशी करताना दिसत आहे.

अनेक वर्षांपासून खली आणि राखीची मैत्री असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या जुन्या मैत्रिणीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी खली तिथे गेला असताना, ‘खली भाई आप बुलबुल को बुलाकर उससे मुकाबला करो और मेरा बदला लेलो’… असे राखी सावंत म्हणाली आहे. याशिवाय राखी

तसेच राखीने आपल्या इन्स्टावर तपासणीला आलेल्या डॉक्टरांसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये राखी डॉक्टरांना सांगते आहे की तिला डोक्यापासून पायापर्यंत दुखापत झाली आहे. मला आपटणारी रेसलर वेडी असल्याचंही ती डॉक्टरांना सांगते आहे. तर दुसरीकडे राखीने या घटनेमागे तनुश्री दत्ताचा हात असल्याचंही म्हटलं आहे.

तनुश्रीने त्या रेसलरला पैसे देऊन मला आपटवल्याचा आरोप राखीने केला आहे. राखीच्या या आरोपामुळे #MeToo मोहीमेनंतर आता राखी सावंत आणि तनुश्री दत्ता यांच्यातल्या वादाला एक नवं वळण लागण्याची शक्यता आहे. आता या प्रकाराबाबत तनुत्री राखीला काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *