Jaimaharashtra news

#CoronaVirus वर राखी सावंतचे उपाय

यापूर्वी कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी चायनाला जात असल्याचा दावा करणारी ड्रामाक्वीन राखी सावंत आता पुन्हा कोरोनासंदर्भात पोस्ट करायला लागली आहे. माणसाने खूप पापं केल्यामुळे कोरोना व्हायरस होत आहे, असा दावा तिने या पोस्टमध्ये केला आहे. यावर उपाय म्हणून सर्वांनी देवाच्या चरणी जावं आणि कोरोना पळवावा, असं आवाहन तिने केलं आहे.

राखी सावंतचं आवाहन

Corona Virus सगळीकडे पसरतो आहे. या व्हायरसपासून बचावासाठी सगळीकडे हातपाय धुण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र आत्मा कसा धुणार? असा सवाल राखी सावंतने केला आहे. माणसांनी अनेक पापं केल्यामुळेच आपल्याला धडा शिकवण्यासाठी कोरोना व्हायरस आला आहे, असं राखी सावंतने म्हटलं आहे.

यावर उपाय म्हणून देवाच्या चरणी आपल्या पापांची माफी मागा, असा सल्ला तिने लोकांना दिला आहे. कोरोना व्हायरस कोणताही भेदभाव न करता हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वच धर्माच्या लोकांना होतोय. तसंच तो गरीब श्रीमंत हा भेदभावही करत नाही. त्यामुळे देवाकडे सर्वांनी नतमस्तक होऊन माफी मागा. असं केल्यास तुम्हाला कोरोना होणार नाही, अशी मला खात्री आहे

कोरोना व्हायरसवर पूर्वी केलेले व्हिडिओ

राखी सावंतने यापूर्वीही कोरोना व्हायरससंदर्भात व्हिडिओ पोस्ट केले होते. आपण चीनला जात असून कोरोना व्हायरसला संपवूनच परत भारतात येऊ अशी बडबड आधीच्य एका व्हिडिओत तिने केली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण चीनला जात असल्याचं सांगत माझ्यासाठी प्रार्थना करा, असंही ती म्हणाली होती. आपण नासाकडून कोरोनाला मारायला स्पेशल औषध घेऊन जात असल्याचा दावा तिने व्हिडिओद्वारे केला होता.

Exit mobile version