Mon. Aug 19th, 2019

#Rakshabandhan सीमेवरील सैनिक बंधूंसाठी विद्यार्थिनींनी बनवल्या राख्या!

0Shares

बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. पण देशातील जनतेच्या संरक्षणार्थ सीमेवर लढणारे आपले सैनिक बांधव या दिवशी आपल्या कुटुंबापासून दूर असतात. ते कुटुंबापर्यत पोहचू शकत नाही. म्हणूनच जि.प. शाळा तळेगाव दिघे शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या छोट्या विद्यार्थिनींनी आपल्या वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः राख्या बनवल्या आणि त्या राख्या सीमेवर असणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी पाठवल्या.

त्यासाठी तळेगाव दिघे परिसरातील सैनिक बांधवांचे पत्ते घेण्यात आले आणि पोस्टाने 251 राख्या पाठवण्यात आल्या.

आपल्या मायभूमीच्या शाळेतील भगिनीने पाठविलेल्या राख्या जेव्हा त्या सीमेवरील बंधुराजास पोहचतील तेव्हा नक्कीच त्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल.

वर्गशिक्षकांनी साथ देत सर्व विद्यार्थ्यांची राखी बनविण्याची कार्यशाळा घेतली.

शाळेच्या या देशप्रेमाबरोबरच बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या चिमुकल्या मुलांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल तळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ग्रामपंचात सदस्य व ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन कमेटी यांनी शाळेचे विशेष कौतुक केलं.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *